आरोग्य विभागात लवकरच 25000+ जास्त पदांची भरती - The Nokari

The Nokari

सर्व नोकरी विषयक जाहिराती या साईटवर देण्यात येतील.

Post Top Ad

Wednesday, April 1, 2020

आरोग्य विभागात लवकरच 25000+ जास्त पदांची भरती

Arogya Vibhag Bharti 2020

आरोग्य विभागात लवकरच 25000+ जास्त पदांची भरती
Arogya Vibhag Bharti 2020
महाराष्ट्राच्या आरोग्य विभागात लवकरच मेगा भरती होणार आहे. या भरती अंतर्गत 25 हजारांपेक्षा अधिक रिक्त पदंभरण्यात येणार आहे. सध्या सुरु असलेल्या कोरोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार हा मोठा निर्णय घेणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत.
मागील काही वर्षात आरोग्य विभागातील भरती प्रलंबित आहे. परंतु सध्या कोरोना मुळे आरोग्य विभागात मुबलक मनुष्यबळ असणे आवश्यक आहे. या मुळे आता सरळ मुलाखती द्वारे हि जिल्हानिहाय भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ही पदं लवकरात लवकर भरुन कोरोनाशी दोन हात करण्यासाठी राज्य सरकार तयारीला लागलं आहे.
दरम्यान, आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेच्या या बातमीला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दुजोरा दिला आहेत. आरोग्य विभाग हा महत्त्वाचा विषय आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मी या विषयाचा पाठपुरावा करत होतो. विधानसभेतही मी याबाबत आश्वासन दिलं होतं. नर्सेस, मल्टिपर्पज वर्कर, टेक्निशियन, डॉक्टर यांचा या भरती प्रक्रियेत समावेश असतील,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
तसंच महत्वाचे म्हणजे या भरती प्रक्रियेदरम्यान गर्दी केली जाणार नाही. यासाठी रांगा नसतील. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या विशेषाधिकाराच्या माध्यमातून शिस्तबद्ध पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जाईल,” असंही त्यांनी सांगतिलं.

चालू असलेल्या आरोग्य विभागातील भरती Arogya Vibhag Recruitment 2020

**UPSC/MPSC MOTIVATIONAL STORY**

Like us On Facebook www.facebook.com/thenokari Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहितीसाठी www.thenokari.com वर भेट द्यावी.
Telegram Channel- https://t.me/thenokari
रोज नवीन नोकरी जाहिरात मिळवण्यासाठी The Nokari ला Follow करा आणि मित्रांना शेअर करा.

Post Bottom ads