बी.एड प्रवेश परीक्षेसाठी 20 मे पर्यंत अर्ज
Application for B.Ed Entrance Exam till May 20
शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेल्या बी. एड. या दोन वर्ष
व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे.
त्यासाठी अर्ज 20 मेपर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत.
राज्यातील सुमारे 90 बी. एड. महाविद्यालयांत 44 हजार जागा उपलब्ध आहेत. गेल्या सहा वर्षांपासून शिक्षक भरती बंद आहे.
पात्रता असूनही नोकरीची संधी मिळत नसल्यामुळे बी. एड.च्या प्रवेशाकडे
विद्यार्थ्यांचा कल कमी झाल्याचे दिसून येते. मात्र, केंद्र
सरकारने शैक्षणिक धोरणांमध्ये बदल करत बी. एड. हा अभ्यासक्रम आता पदवी शिक्षणासोबत
तीन वर्षांचा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अद्याप अंमलबजावणी होत नसल्याने
सध्या पदवी शिक्षणानंतर दोन वर्षांत बी. एड. या
व्यावसायिक पदवीव्युत्तर पदवीचे शिक्षण घ्यावे लागते. करोनाच्या पार्श्वभूमीवर
इच्छुक विद्यार्थ्यांकडून 20 मेपर्यंत ऑनलाइन अर्ज मागवण्यात
आले आहेत.
पात्रता -
- - कोणत्याही शाखेतील पदवी, पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी.
- -पदवी, पदव्युत्तर पदवी स्तरावर (खुला संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी किमान 50% गुण तर राखीव संवर्गासाठी किमान 45% गुणांसह उत्तीर्ण विद्यार्थी
- -कोणत्याही शाखेतील पदवी, पदव्युत्तर पदवी शेवटच्या सेमीस्टरची परीक्षा देणारा अॅपियर विद्यार्थी.
- फॉर्म भरण्यासाठी लागणारी मुळ कागदपत्रे
- - दहावी, बारावी गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र
- -पदवी प्रथम, द्वितीय, तृतीय वर्ष गुणपत्रक
- -रहिवासी प्रमाणपत्र
- -राखीव संवर्गासाठी जात प्रमाणपत्र
- -आधार कार्ड
- -पासपोर्ट साईज फोटो
- - डिजिटल स्वाक्षरी
- -परीक्षा केंद्रांसाठी 1,2,3 पर्याय द्यावयाचे आहेत.
- -मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नॉन क्रिमेलिअर प्रमाणपत्र
- -जात वैधता प्रमाणपत्र
ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट
**UPSC/MPSC
MOTIVATIONAL STORY**
Like us On
Facebook www.facebook.com/thenokari Daily Job
Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहितीसाठी www.thenokari.com वर भेट द्यावी.
रोज नवीन
नोकरी जाहिरात मिळवण्यासाठी The Nokari ला Follow
करा आणि मित्रांना शेअर करा.
Social Plugin