२१ ते २८ मार्चदरम्यान पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन
Pandit Deendayal Upadhyay Online Employment Fair
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व
उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या विद्यमाने 21 मार्च ते 28
मार्च या कालावधीदरम्यान स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त
ऑनलाईन पद्धतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या व
नियोक्त्यांकडून रिक्त पदे www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहेत. या पोर्टलवर नोंदणी
केलेल्या आणि रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे किंवा ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांच्या
मुलाखती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात येणार आहेत. या संधीचा जास्तीत
जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन
मार्गदर्शन केंद्रामार्फत करण्यात येत आहे.
नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर किंवा ॲड्रॉईड मोबाईल धारकांनी प्ले स्टोअरमधून mahaswayamॲप मोफत डाऊनलोड करून नोंदणी करावी. तसेच, लॉग-इन करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी आवेदन करावे, असेही जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
Like us On Facebook www.facebook.com/thenokari Daily Job Updates ला भेट देण्यासाठी किंवा आधिक माहितीसाठी www.thenokari.com वर भेट द्यावी.
Whtas App Group join - https://cutt.ly/SfBBO2f
Telegram Channel- https://t.me/thenokari
Instagram - https://www.instagram.com/thenokari/
Twitter- https://twitter.com/NokariThe?s=09
रोज नवीन नोकरी जाहिरात मिळवण्यासाठी The Nokari ला Follow करा आणि मित्रांना शेअर करा.