Type Here to Get Search Results !

UGC च्या 'नेट' साठी प्रवेशपत्रे उपलब्ध | Admit Card available for UGC's 'Net'

0

UGC च्या 'नेट' साठी प्रवेशपत्रे उपलब्ध | Admit Card available for UGC's 'Net'

UGC च्या 'नेट' साठी प्रवेशपत्रे उपलब्ध | Admit Card available for UGC's 'Net'

विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच UGC च्या 'नेट' साठी प्रवेशपत्रे उपलब्ध आहेत. ९ जुलै रोजी परीक्षेला बसणारे उमेदवार https://ugcnet.nta.nic.in/ या वेबसाइटवरून ही प्रवेशपत्रे डाउनलोड करू शकतील.

देशातील विद्यापीठे, वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आणि कनिष्ठ संशोधन फेलोशिप आणि सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्र होण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते. UGC नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) मार्फत राष्ट्रीय पात्रता परीक्षा (UGC NET) आयोजित करते. ही परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते.

तथापि, डिसेंबर 2021 ची परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आली होती, त्यामुळे या परीक्षा सत्रांचे सातत्य राखण्यासाठी डिसेंबर 2021 आणि जून 2022 च्या परीक्षा एकत्र घेतल्या जातील. त्यानुसार ही परीक्षा 9, 11 आणि 12 जुलै तसेच 12, 13 आणि 14 ऑगस्ट 2022 दरम्यान होणार आहे. 9 जुलै रोजी होणाऱ्या परीक्षेची प्रवेश प्रवेशपत्रे उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. 11 आणि 12 जुलैच्या परीक्षेची प्रवेशपत्रे उमेदवारांना लवकरच उपलब्ध करून दिली जातील, असे NTA ने सांगितले. 84 विषयांची परीक्षा देशभरातील 91 शहरांमध्ये घेतली जाणार आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close